Posts

Showing posts from April 2, 2024

गोर बंजारा साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ - भीमणीपुत्र काका !

Image
❖ गोर बंजारा साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ - भीमणीपुत्र काका !    ‌‌           ◆ डॉ. सुभाष राठोड, पुणे      गोरबंजारा साहित्यातील एक गाजलेले नाव म्हणजे भीमणीपुत्र तथा मोहन गणुजी नाईक यांचा आज ७४ वा वाढदिवस, त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी अनंत  शुभेच्छा ! वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यिक कार्यावर संक्षिप्त स्वरूपात टाकलेला  प्रकाश !    गोर बंजारा साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे 'भीमणीपुत्र काका !' गोर बंजारा साहित्याचे ऊर्जास्रोत,  गोरमाटी साहित्य सारस्वतातील प्रथितयश लेखक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, असे आदरणीय *'भीमणीपुत्र काका ' यांचे नाव भारतात गोरबंजारा साहित्य क्षेत्रात ज्याला माहीत नाही असा माणूस सापडणे विरळाच म्हणावा लागेल !    गोर बंजारा तथा गोरमाटी बोलीभाषेच्या अस्मितेविषयी आत्मभान जागृत करण्याचे सर्वांत मौलिक कार्य जर कोणी केले असेल तर निर्विवादपणे ' भीमणीपुत्र काकांचे नाव आपल्याला आवर्जून घ्यावे लागेल ! गोर बंजारा साहित्याला नवनवे अस्सल गोरमाटी श...