Posts

Showing posts from April 11, 2024

गोरबंजारा समाजाची काशी - पोहरा देवी - डॉ. सुभाष राठोड

Image
  गोरबंजारा समाजाची काशी - पोहरा देवी “थाळी नंगाराच्या निनादाने दुमदुमते अवघी पोहरानगरी !   महाभोग , महाआरती , आरदासाच्या पवित्र सुराने गजबजते बंजारा काशी !”         संपूर्ण भारतातील गोर - बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले ‘तीर्थक्षेत्र पोहरादेवी’ हे ‘गोर-बंजारा समाजाची काशी’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे . हे तीर्थक्षेत्र भारतीय गोर - बंजारा समाजात अजरामर झालेले असून येथे दरवर्षी रामनवमी , नवरात्रात मिळून वर्षाकाठी चार वेळा भव्य यात्रा भरते . येथे जगदंबा देवीचे भव्य मंदिर असून गोर - बंजारा समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे महापुरुष संत सेवालाल महाराज यांची पोहरादेवी येथे समाधी आहे . जगदंबा देवी , संत सेवालाल महाराज , सामकी   माता , संत रामराव महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या या तीर्थस्थळी देशभरातून भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी , नवस फेडण्यासाठी येत असतात .‌ महाराष्ट्राबरोबरच आंध्र , तेलंगणा , कर्नाटक , राजस्थान , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , गुजरात व भारतातील इतर राज्यातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी नित्यनेम...