Posts

Showing posts from June 25, 2024

● समतेचे दीपस्तंभ : राजर्षी शाहू महाराज - डॉ. सुभाष राठोड

Image
    २६ जुलै - छत्रपती शाहू महाराज जयंती विशेष.. समतेचे दीपस्तंभ : छत्रपती शाहू महाराज                                          ● प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे           महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, समतेचे अग्रणी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, अस्पृश्यांचे उद्धारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे उत्तराधिकारी, दूरदृष्टीवान शासक, थोर समाजसुधारक, युगपुरुष शिक्षणप्रेमी आणि दलित-शोषितांचे कैवारी, स्त्री-पुरुष समानतेचे समर्थक, समाज परिवर्तनाचे अग्रदूत, क्रांतिकारी राजे, त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला आहे असे थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची २६ जुलै रोजी जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त त्यांचे महान विचार व कार्यास विनम्र अभिवादन ! महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्यास ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे संबोधले जाते.     राजर्षी ...