● जलक्रांतीचे जनक : सुधाकरराव नाईक - डॉ. सुभाष राठोड, पुणे

● १० मे - जलसंधारण दिन विशेष जलक्रांतीचे जनक : सुधाकरराव नाईक © डॉ. सुभाष राठोड, पुणे महाराष्ट्र राज्याचे १३ वे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल पद भूषविलेल्या सुधाकरराव नाईक यांचा आज १० मे स्मृतिदिन, स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन ! बाणेदार आणि पाणीदार नेता अशी आजही जनमानसात ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा अगदी गावाच्या सरपंचापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पर्यंतचा राजकीय प्रवास अतिशय रंजक व उद्बोधक आहे. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे ते पुतणे असून *'जलक्रांतीचे जनक'* म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जातात. ते अल्पकाळच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते परंतु त्यांच्या अल्पशा कार्यकाळात त्यांनी राज्याच्या हितासाठी केलेली अनेक लोककल्याणकारी कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. ...