AI क्रांती : नवीन जगाचा उदय - डॉ. सुभाष राठोड
.jpeg)
कृत्रिम बुद्धिमत्ता AI क्रांती : नवीन जगाचा उदय ⋄ प्रा . डॉ. सुभाष राठोड , पुणे या पृथ्वीतलावर केवळ मनुष्यच असा प्राणी आहे, की जो इतर प्राण्यांच्या तुलनेत बुद्धिमान समजला जातो. ज्या प्राण्यांमध्ये किंवा मनुष्यांमध्ये विचार करण्याची क्षमता असते त्यांना बुद्धिमान म्हटले जाते. अनेक प्राण्यांमध्ये बुद्धिमत्तेचे लक्षणे दिसून येतात, परंतु विवेकबुद्धी हा गुण केवळ मनुष्यामध्येच आढळतो म्हणून मनुष्य बुद्धिमान समजला जातो. आजच्या काळात तंत्रज्ञानाने अतोनात प्रगती केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा उदय झाला आहे. आजच्या युगात, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे, तरीही अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या जीवनात सुधार...