◆ प्रा.पी.टी.चव्हाण : भटके-विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज !

◆ प्रा. पी. टी.चव्हाण : भटके, विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज ! सामान्यातून असामान्य झालेल्या परंतु सतत सामान्यांची काळजी वाहणारे विमुक्त – भटके,ओबीसी,उपेक्षित, वंचितांचे संघर्षिल व धाडसी नेते, आपल्या अनोख्या कार्यशैलीचा वेगळ्या प्रकारे जनमानसात ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक धडाडीचे तथा उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.पी.टी.चव्हाण सर.. वाडी वस्ती तांडे,पाडे, पालनिवासी,दुर्लक्षित,वंचित, निराधार, बहुजन व भटक्या – विमुक्तांच्याप्रती अत्यंत संवेदनशील असलेले प्रा.पी.टी. चव्हाण हे महाराष्ट्रातील एक समाजमान्य सर्वश्रुत नेते आहेत. जनमानसातील त्यांची ओळख. तसेच ‘भटके विमुक्त व बहुजन बांधवांचे नेते’ अशीच त्यांची खरी ओळख. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व व परिश्रमाच़्या बळावर जनमाकेनसात आपल्या कार्याचा ठसा उमटवता येऊ शकतो या विचारावर गाढ श्रद्धा असलेले, त्यासाठी सायास करावे लागतात. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे !’ ही समर्थांनी दासबोधात सांगितलेली उक्ती प्रा. पी. टी. चव्हाण सरांच्या बाबतीत सार्थ ठरते. कोणतीही चळवळ ही निःस्वार्थी हेतूने उभारलेली असावी.ती जनह...